Conceived, owned and run by Shri. Akkalkotswami Seva Mandal (Regd.);  Vadavali Section, Ambernath, Dist. Thane, Maharashtra State, India

 

मंडळाची आजपर्यंत कार्यपूर्ती :
 

आत्तापर्यंत खालील कामे पूर्णत्वास गेली आहेत.
 

१. वृद्धाश्रमाचे ८,००० स्क्वे. फू. पर्येतचे जोते (Plinth  Level) बांधकाम तयार आहे.

२. १००० चौरस फुटाच्या ४ खोल्या वैद्यकीय शिबीर भरविण्यासाठी तयार आहेत. तसेच तळमजल्यावरील ६ खोल्या व

   जोत्यावर ४ खोल्या वृद्धाश्रमाच्या सभासदांसाठी पूर्ण तयार आहेत. सध्या तिथे १४ ते १५ वृद्ध राहत आहेत

३. उपासना केन्द्र प्रार्थना सभागृह, गोशाळा/गोठा तयार आहे.

४. अन्नछत्र : सर्वांत महत्वाचे म्हणजे गेल्या ५ वर्षांत अन्नछत्रांतील मुलांचे वजन वाढलेले असून 

   त्यांच्या तब्येतीत उत्तम सुधारणा झाली आहे.

५. आजमितीस ८ ते १० ग्रामस्थांना दैनंदिन कामाकरिता रोजगार उपलब्ध करून दिला असून आमच्या 

    बाकीच्या योजना कार्यान्वित झाल्यासआम्ही शेजारच्या आनंदवाडी खेड्यांतील सर्व स्त्री, पुरुषांनाही रोजगार देऊ शकू.

६. ओएनजीसी कंपनीने आमच्या फिरत्या दवाखान्यासाठी एक रुग्णवाहिका दिली आहे.

७. ओएनजीसी कंपनीने एक खोलीसुद्धा वृद्धाश्रमासाठी दिली आहे.

८. मेसर्स एच. पी. सी. एल. (मे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड) नवी मुंबई, यांनी जोत्यावर रुपये १९ लाख

    किमतीच्या ४ खोल्या वृद्धाश्रमाच्या सभासदांसाठी बांधून दिल्या.

९.  नेत्रशिबिरांत वेगवेगळ्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या नि:शुल्कपणे पार पडल्या.

१०. रोज श्रीस्वामी समर्थ उपासना केंद्रातील उपासना केंद्रात बऱ्याचश्या भक्तांकडून ध्यान-धारणा/प्रार्थना केली जाते.
 

 स्वामीधाम प्रकल्पांचे मुल्यांकन :
 

अनूक्र. खर्चाचा तपशील

अंदाजे खर्च रु.

.   वृद्धाश्रमाच्या उर्वरित कामाच्या पहिल्या टप्प्यातील ८,००० स्क्वे. फू. बांधकामाचा खर्च ९५,००,०००
.   प्रसिद्धी आणि जाहिरात ५,००,०००
.   सौरऊर्जा आणि कुपनलिकांसाठी ५,००,०००
.

  स्वयंपाक गृहातील सामुग्री (सिलेंडर, भांडी, इत्यादि…)

१५,००,०००

.

  बायो-मास १० के. व्ही.ए., विद्युत जनित्र, पवनचक्की.

१२,००,०००

  एकूण

१,३२,००,०००

स्वामीधाम प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्या अंतर्गत  :

    १. २५ व्यक्तींसाठी वृद्धाश्रम.

    २. १५ मुलांसाठी अनाथाश्रम.

    ३. वैद्यकीय केंद्र.

    ४. उपासना केंद्र.
 

स्वामीधामद्वारे देणगीदारांना मिळणारे फायदे :

    १. समाजातील कमनशिबी व दुर्दैवी व्यक्तींच्या/मुलांच्या चेहऱ्यांवर आढळणारा आनंद व समाधान.

    २. काही अंशी समाजऋण फेडल्याचे समाधान.

    ३. देणग्या आयकराच्या ८० जी कलमाखाली करमुक्त.

    ४. कंपनी/ संस्थेची प्रसिद्धी.

   ५. देणगीदार कंपनीच्या नांवाचा फलक मंडळाच्या कार्यक्रमाच्यावेळी लावला जातो.

    ६. वृद्धाश्रम, अनाथाश्रम, अन्नछत्र व वैद्यकीय केंद्र इत्यादि खोल्यांवर देणगीदाराच्या नांवाची फारशी बसवली जाईल

 


मुख्य पान  |  आमच्या विषयी | मंडळाची उद्दिष्टे | संस्थेची कार्ये | आमची प्रकाशनें  | देणगी | मंडळाची कार्यपूर्ती | संपर्क |  


 
     
 

:::  संपर्क  :::

 
View Larger Map
   

श्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ
केअर ऑफ  : श्री. चिंतामणि श्रीराम रहातेकर,
४०, श्री स्वामी कृपा, पहिला मजला, वडवली सेक्शन,
अंबरनाथ (पूर्व) - ४२१ ५०१. जिल्हा : ठाणे.  महाराष्ट्र, इंडिया.

Tel : +91 9820032772