संस्थेची कार्ये

We know the secret of your success

संस्थेची कार्ये

    कार्यरत असलेल्या योजना :

    अ. संस्थेने २७ एप्रिल, २००९ पासून वैद्यकीय तपासणी शिबीर व फिरता दवाखाना सुरु केलेला असून दर रविवारी वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यांत येते. शिबिरांत औषधे मोफत पुरविली जातात मंडळाच्या तपासणी केंद्रात

    खालील नमूद केलेल्या शाखांचे तज्ञ येतात :
    • १. नेत्रविशारद
    • २. कान, नाक, घसा, तज्ञ.
    • ३. हृदयरोगतज्ञ.
    • ४. स्त्रीरोग तज्ञ.
    • ५. बालरोगतज्ञ
    • ६ दंतचिकित्सक.

    वरील डॉक्टरांची नांवे खालील प्रमाणे :

    १. डॉ. विजय चिले हृदयरोगतज्ञ.
    २. डॉ. गोविंदसिंग गिल कान, नाक, घसा, तज्ञ..
    ३. डॉ. गजानन धानिपकर एम. डी (मेडिसिन).
    ४. डॉ. उपेंद्र भावे एम.बि.बि. एस. डिओएमएस, नेत्ररोगतज्ञ.
    ५. डॉ. दीपा भावे बि. ए. एम.एस.
    ६. डॉ. सतीश परमार स्त्रीरोग तज्ञ.
    ७. डॉ. समीर कुलकर्णी एम. डी. ( मेडिसिन)
    ८. डॉ. भुमीका कोहली एम. डी (मेडिसिन).
    ९.. डॉ. सीमा बेन्द्रे दातांचे सर्जन.
    १०. डॉ. मधुसूदन बेन्द्रे दातांचे सर्जन
    ११. डॉ. कविता नेहेते बि. एच. एम. एस. (आहारतज्ञ)
    १२. डॉ. अर्चना परब बि. एच. एम. एस.
    १३. डॉ. रवींद्र सोनंद बि. एच. एम. एस.
    १४. डॉ. स्वप्नील अत्तरदे बि. ए. एम.एस. ( फँमीली फ़िजिशिअन )

    ब. शिबिरा दरम्यान डॉक्टरांच्या असे लक्षांत आले की, मुलांना कुठलाही आजार नाही परंतु बरीचशी मुले कुपोषित आहेत. म्हणून मंडळाने ७ जुलै, २००९, पासून अन्नछत्र सुरु केले आहे. रोज संध्याकाळी १२ वर्षाखालील मुलांना सकस व पोटभर मोफत जेवण दिले जाते.

    क. प्रार्थनेसाठी सभागृह.

    आगामी योजना :
    • साधारणतः १०० ज्येष्ठ नागरीकांसाठी वृद्धाश्रम .

    त्यांतील रहिवाशांसाठी असणाऱ्या सोयी/ सुविधा:
    • १. २ व्यक्तीसाठी स्वतंत्र खोली, ४ व्यक्तीसाठी सामान्य खोली
    • २. संडास व बाथरूम सर्व खोल्यांना संलग्न.
    • ३. प्रत्येक व्यक्तीसाठी पलंग, कपाट, टेबल व खुर्ची.
    • ४. प्रत्येक खोलीत टाटा स्काय संच व गरम पाण्याची सोय.
    • ५. दिवसांतून ३ वेळा गरम चहा, २ वेळा नाश्ता, व २ वेळा जेवण.

    इतर सुविधा :
    • ६ वैद्यकीय शिबिरांत मोफत वैद्यकीय तपासणी व मदत/ उपचार.
    • ७. २४ तास वैद्यकीय सेवा/मदत.
    • ८. २४ तास वाहतूक सेवेची उपलब्धता.
    • ९. सर्वांसाठी सामाईक भोजन कक्ष व प्रार्थना कक्ष.
    • १०. वर्तमानपत्रे व करमणूकीची पुस्तके उपलब्ध असलेले एक सामाईक वाचनालय.
    • ११. सुनियोजित उद्यान.
    • १२. २४ तास पाण्याच्या उपलब्धतेसाठी कुपनलिका व विहीर.
    • १३. रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवा.

    १०० व्यक्तींची सोय ४ टप्प्यांत तरतूद :
    • अ) १२ ' × २४ ' च्या २० स्वतंत्र खोल्या - प्रत्येक खोलीत २ व्यक्ती.
    • ब) २४ ' × २५ ' च्या १५ सामाईक खोल्या - प्रत्येक खोलीत ४ व्यक्ती.
    • क) ४० ' × ४५' स्वयंपाकगृह, भांडारगृह व भोजनकक्ष.
    • ड) बाग कामाची देखरेख व निगा.
    • इ) सर्व खोल्या संडास व स्नानगृहाच्या सोयींनीयुक्त.

    स्वामीधाम अंतर्गत उपक्रम :
    • अ) प्रात:कालीन व सायंकालीन प्रार्थना.
    • ब) सकाळ व संध्याकाळ फेरफटका/चालणे.
    • क) चहा, सकाळचा नाश्ता व २ वेळेचे जेवण.
    • ड) प्रासंगिक सांस्कृतिक कार्यक्रम.
    • इ) प्रासंगिक उत्सव व स्नेहसंमेलन.

निराधारांचा आनंद आणि समाजातील नशीबवानांचा आनंद.

TOP