Conceived, owned and run by Shri. Akkalkotswami Seva Mandal (Regd.);  Vadavali Section, Ambernath, Dist. Thane, Maharashtra State, India

 

           

मोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा

 

मोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा

 

मोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा

 
           

 

 

 
           

मोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा

 

मोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा

 

मोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा

     

           

मोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा

 

मोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा

 

मोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा

 

 

   

मोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा

 

मोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा

   
       


 

पुस्तकें  : 
१. अध्यात्मिक चर्चासत्र  २. षडरीपूशी विवेकी मैत्री ३. गुरुमहिमा ४. जीवन-मुक्ती  ५. सगुणातून निर्गुणाकडे 
६. ध्यान (मनाच्या चाळ्यातून ) ७. आरोग्य प्राप्तीचा मेवा ८. सुलभ देवपूजा, संध्या, व वैदीक सुक्ते. ९. सामुदायिक उपासना 
१० . नि : संतान शाप कि वरदान ? 
वरील दहा पुस्तकांचा संक्षिप्त  परिचय : 
१. अध्यात्मिक चर्चासत्र :
सर्व सामान्य भक्तांच्या / मुमुक्षुच्या शंकाचे निरसन ६ ते ८ महिने दर गुरुवारी चर्चासत्र आयोजित करून सामुदायिकरीत्या 
आणि शास्त्राधारे केंलें आहे.
२. षडरीपूशी विवेकी मैत्री : 
अध्यात्मिक प्रगतीसाठी षडरीपू काबूत आणावेत, त्यांच्यावर आपला ताबा असावा असें परंपरेने  सतत सांगण्यात येतें. 
परंतु हें  कसें साधावें ? यावर सविस्तर कुठेंहिं सांगण्यांत आलेले नाहीं. डॉ. कृ. के. कोल्हटकर यांच्या 'पातंजलयोग  
ग्रंथात हें सांगितले आहे. परंतु थोडेसें जास्त सोपें  सुचले व लिहावेसें वाटले म्हणून हें पुस्तक लिहिले गेले.
३. गुरुमहीमा :
काही मुमुक्ष गुरूच्या शोधांत असतात परंतु संभ्रमात असतात की, गुरु करावा की करू नये ? 
गुरु करणे असल्यास आपणास झेपेल काय ? गुरूंच्या गुलामगिरीत राहणे आपल्याला कितपत जमेल ? 
तसेंच केलेल्या गुरूचा वाईट अनुभव आला तर तो गुरु सोडता येईल किवा कसे ? या सर्व संभ्रमाचे निराकरण या पुस्तकांत केलेंले आहे.
४ . जीवन- मुक्ती :
संसारात राहूनच / घरांत राहूनच 'जीवन- मुक्त ' कसे राहता येईल यासंबंधी या पुस्तकांत सांगितले आहे.
५. सगुणातून निर्गुणाकडे :
'सगुण उपासना ' म्हणजे नावेंत बसून नावाड्यावर  पूर्ण विश्वास ठेवून अध्यात्मिक प्रवास करणे व 'निर्गुण उपासना ' 
म्हणजे स्वतःला प्रवाहात  निर्भयपणे  झोकून देणें. सर्वंकष  शरणागती पत्करून जीवनांतील सुख-दु :खें टाळण्याचा प्रयत्न न करता ती 
विवेकी बुद्धीने सहजपणे भोगत भोगतच जीवानांतून मुक्त होणे.
६. ध्यान (मनाच्या चाळ्यातून )
माणसाच्या मनांमध्ये चांगले, वाईट विचार अखंडपणे चालुंच  असतात. त्यांच्यावर आपला अजिबात ताबा नसतो. 
परंतु ध्यान लागावे हि इच्छा तर असतेच. यासाठी हें   मार्गदर्शनपर पुस्तक आहे.
७. आरोग्य प्राप्तीचा मेवा :
रोगाची सुरुवातिची लक्षणे ओळखून लवकर व योग्य वेळेवर केलेले साधे सोपे घरगुती उपाय पुढे येणारे गंभीर आजार टाळू शकतात 
यावर मार्गदर्शनपर हे पुस्तक आहे.  तसेच स्वयंसूचनाचे शास्त्र, सुक्ष्म  व्यायाम, योगासने, प्राणायाम, अक्युप्रेशर, मुद्रा विज्ञान चिकित्सा, 
धातूंचे उपचार, आरोग्य पेय / आरोग्य चूर्ण, शिवाम्बू, खाद्यपदार्थाचे गुणधर्म  साधे सोपे घरगुती उपाय यावर सुद्धा मार्गदर्शन 
या पुस्तकांत  केले आहे.
८. सुलभ देवपूजा, संध्या व वैदिक सुक्ते. 
देवपूजा या विषयावर बरीच पुस्तके आज बाजारात उपलब्ध आहेत. परंतु बऱ्याच लोकांना पूजेविषयी, 
पुजेमधील क्रियांविषयी फारशी माहिती नसते आणि पूजेला बसल्यावर यजमानास बऱ्याच अडचणी येतात. आजकाल पुष्कळशा 
गुरुजींना पूजेविषयी, पुजेमधील क्रियेविषयी समजून सांगण्यास वेळ नसतो. यजमानाला ते सर्व समजून घेण्याची इच्छा तर असतेच. 
तसेच वेगवेगळ्या पूजेसाठी वेगवेगळी पुस्तके खरेदी करावी लागतात. या सर्व गोष्टी लक्षात घेत हे पुस्तक 
प्रकाशित करण्याचे धाडस मंडळाने केले आहे.
९. सामुदायिक उपसना :
यामध्ये निरनिराळ्या देवतांची, संतांची पदे, आरत्या, स्तोत्रे व कवचे आहेत. तसेच हरिपाठ, मनाचे श्लोक, भाद्रपद महिन्यातील गणपतीच्या 
आरत्या सर्व देवींच्या नवरात्रीतील आरत्या इत्यादी आहेत.
१०. नि : संतान शाप कि वरदान ?
हे पुस्तक संतान असलेल्या लोकांच्या विरुध्द नाही किंवा संतान होऊ नये असेही अजिबात नाही. फक्त संतान असण्यामुळे निर्माण  होणाऱ्या मायेविरुद्ध आहे कारण पुत्रेष्णा हीच जीवनमुक्ती साठी मोठा अडथळा आहे. तसेच नि:संतान व्यक्तीला घरातील व समाजातील  दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांकडून होणारी अवहेलना, मानसिक पीडा, कुचेष्टा वगैरे व त्यामुळे होणारे दुष्परिणाम उदा. नैराश्य, मानसिक संतुलन बिघडणे /आत्महत्येस प्रवृत्त होणे यावर आळा बसावा या दृष्टीने व नि:संतान व्यक्तीना त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीचे / संधीचे सोने करण्यासाठीही मार्गदर्शनपर हे पुस्तक आहे हे वाचकानी कृपया ध्यानात घ्यावे.

वरील सर्व पुस्तकांची सहावी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. तसेच हि सर्व पुस्तके हिंदी, गुजराथी व इंग्रजीमध्येसुद्धा प्रकाशित झाली आहेत. 

सीडीज :- १. रुद्राध्याय - अध्यापन आणि अध्ययन.
           २. वैदिक सूक्ते (पुरुष सूक्ते, श्रीसूक्त  देवे ) - अध्यापन आणि अध्ययन.
              वरील रुद्र व अन्य सूक्ते आपल्याला या सीडीजद्वारे घरच्या घरीच गुरुजींच्या अनुपस्थितीत सहज शिकता येतील.
           ३. ऐकाल तर वाचाल ( स्वामीकृपेतून आलेल्या १६ बोध वाक्यांवर निरुपण)
              'गीत गुरुवैभव' हा श्रीगुरूचरीत्रातील अध्यायावर आधारित २६ गाण्यांचा सीडीचा काव्य संग्रह आहे. 
              वरील पुस्तके, सीडीजचे उत्पन्न मंडळाच्या 'स्वमिधाम' कार्यासाठी खर्च होते.

 


मुख्य पान  |  आमच्या विषयी | मंडळाची उद्दिष्टे | संस्थेची कार्ये | आमची प्रकाशनें  | देणगी | मंडळाची कार्यपूर्ती | संपर्क |  


 
     
 

:::  संपर्क  :::

 
 View Larger Map
   

श्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ
केअर ऑफ  : श्री. चिंतामणि श्रीराम रहातेकर,
४०, श्री स्वामी कृपा, पहिला मजला, वडवली सेक्शन,
अंबरनाथ (पूर्व) - ४२१ ५०१. जिल्हा : ठाणे.  महाराष्ट्र, इंडिया.

Tel : +91 9820032772