मंडळाची कार्यपूर्ती

मंडळाची आजपर्यंत कार्यपूर्ती

आत्तापर्यंत खालील कामे पूर्णत्वास गेली आहेत
  1. १००० चौरस फुटाच्या ४ खोल्या वैद्यकीय शिबीर भरविण्यासाठी तयार आहेत. तसेच तळमजल्यावरील ६ खोल्या व जोत्यावर ६ खोल्या वृद्धाश्रमाच्या सभासदांसाठी पूर्ण तयार आहेत. सध्या तिथे १४ ते १५ वृद्ध राहत आहेत.
  2. उपासना केन्द्र / प्रार्थना सभागृह तयार आहे.
  3. अन्नछत्र : सर्वांत महत्वाचे म्हणजे गेल्या ५ वर्षांत अन्नछत्रांतील मुलांचे वजन वाढलेले असून त्यांच्या तब्येतीत उत्तम सुधारणा झाली आहे.
  4. आजमितीस ८ ते १० ग्रामस्थांना दैनंदिन कामाकरिता रोजगार उपलब्ध करून दिला असून आमच्या बाकीच्या योजना कार्यान्वित झाल्यास, आम्ही शेजारच्या आनंदवाडी खेड्यांतील सर्व स्त्री, पुरुषांनाही रोजगार देऊ शकू.
  5. ओएनजीसी कंपनीने आमच्या फिरत्या दवाखान्यासाठी एक रुग्णवाहिका दिली आहे.
  6. ओएनजीसी कंपनीने एक खोलीसुद्धा वृद्धाश्रमासाठी दिली आहे.
  7. मेसर्स एच. पी. सी. एल. (मे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड) नवी मुंबई, यांनी जोत्यावर रुपये १९ लाख किमतीच्या ४ खोल्या वृद्धाश्रमाच्या सभासदांसाठी बांधून दिल्या.
  8. रोज श्रीस्वामी समर्थ उपासना केंद्रातील उपासना केंद्रात बऱ्याचश्या भक्तांकडून ध्यान-धारणा/प्रार्थना केली जाते.
स्वामीधामद्वारे देणगीदारांना मिळणारे फायदे :
    • समाजातील कमनशिबी व दुर्दैवी व्यक्तींच्या/मुलांच्या चेहऱ्यांवर आढळणारा आनंद व समाधान.
    • काही अंशी समाजऋण फेडल्याचे समाधान.
    • देणग्या आयकराच्या ८० जी कलमाखाली करमुक्त.
    • कंपनी/ संस्थेची प्रसिद्धी.
    • देणगीदार कंपनीच्या नांवाचा फलक मंडळाच्या कार्यक्रमाच्यावेळी लावला जातो.
    • वृद्धाश्रम, अन्नछत्र व वैद्यकीय केंद्र इत्यादि खोल्यांवर देणगीदाराच्या नांवाची फारशी बसवली जाईल.

निराधारांचा आनंद आणि समाजातल्या नशीबाच्या गोष्टींचा आनंद.

TOP